आमच्या विषयी (About Us)

मराठी व्यासपीठ हे व्यासपीठ मराठी कवी ,कवयित्री,लेखक,कथाकार यांचेसाठी आम्ही तयार केले आहे . यातून मराठी कवी ,लेखकांनी आपले जास्तीत जास्त मराठी साहित्य प्रदर्शित करावे हि विनंती . 

 सध्या मराठी भाषेची चाललेली कुचंबना पाहता आपल्यासारख्या असंख्य मराठी बांधवांनी ,मराठी साहित्यीकांनी मराठीच्या समृद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजेत .मराठी भाषेचा ,मराठी साहित्याचा प्रचार,प्रसार व्हावा यासाठी अधिकाधिक मराठी बांधवांनी हातात लेखणी घेऊन स्वतःचे प्रगत,प्रखर,संवेदनशील विचार मांडावेत ही सर्व बांधवांना नम्र विनंती . 

 आपल्या अवतीभवती अशा अनेक घटना,प्रसंग घडतात त्या मन विचलित करणाऱ्या ,हळुवार ,भयानक,किळसवाण्या, आल्हाददाय, दुःखदायक असतात. त्यापाहून आपल्या मनात काहीतरी विचार येतात ,”हे असे का झाले ?”, “असे व्हायला नको होते”,हे असे कसे वागू शकतात”, “अरे वा..” असे उद्गार नकळत येतात. हेच प्रसंग आपण शब्दांच्या रुपात , कथेच्या ,कवितेच्या रुपात लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा . आम्ही नक्कीच त्या आमच्या “मराठी व्यासपीठ” या ब्लॉंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू . यातून आपली लेखन समृद्धी अधिकाधिक बहरत जावो ही सदिच्छा .

एक पाऊल मराठी राजभाषेचा वारसा जोपासण्यासाठी......




Post a Comment