गांव
(कविता क्र.१)
![]() |
Image Source - Google | Image by - webneel |
गावाकडे पैसा कमी म्हणून
मन माझे शहराकडे वळले
कितीही काही झालं तरी सुख गांवातच असतं
मला हे थोडं उशीरा कळले,
तिथं गेल्यावर जरा वेगळंच अनुभवलं
मानूसकी सोडा ओ,
इथं तर सगळे फक्त पैसा पैसा करून पळले
येते आठवण मला माझ्या आई अन् बापाची,
मध्य रात्री आठवण काढून अश्रू डोळ्यतून गळले
इथं फक्त ताण, तणाव अन् धगधगीच जगणं सुरू आहे
पुढं करायचं काय या प्रश्नाने मन मात्र सतत हळवळले
गेलो कधी गावी अधून मधुन
बहिनीने माझ्या एक नाही देन नाही तर पाच पकवान तळले,
जेवणाचं ते ताट पाहून रहावलं नाही मला,
डोळ्यात आलं पाणी अन् ते माझ्या आईला कळले
आई बोलली, पोटाला कमी खातोस काय रे तू बाळ तिथं
गेलास तेव्हा वाघासारखा गेलेलास तु शहरात
कोणाला नसेना पण आईला मात्र ते कळले
खुपंच ओढाताण होत असंल तर ये आपला तु परत
काय नाही त्या शहरात, असं बोलून बापाने माझ्याच मनातले भाव चाळले
४ दिवस घरी राहील्यावर मन कसं भारावून गेलं
आज दूपारी पुन्हा निघायचं ऐकल्यावर घरी सगळ्यांचच मन तळमळले.
जाताना सगळ्यांचा आशिर्वाद घेतला
आईने पाण्याने भरलेले डोळे घेऊन मायेनं डोक्यावर ठेवला
बहिनीणे मिठी मारली अन् मन मोकळं रडली
आज्जीने कासूटा सोडून शंभराची नोट हातावर ठेऊन बोलली पोटाला खात जा जरा,
काका काकू बोलले फोन करत जा रे बाळ अधून मधून
मन कसं अगदी भरून आलं
शेवटी निरोप बापाचा घ्यायला अन् आशिर्वाद घ्यायला पाय पकडले
बापाने पाठीवर काळजीचा हात फिरवला
रहावलं नाही पण पाण्याचा एक थेंब त्यांच्या पायावर पडला
निरोप घेऊन सगळ्यांचा मी बाहेर पडलो
पुढं जाऊन वाटेमध्ये खुप रडलो
गाडी सुरू झाली तसं समोर पुन्हा ती धावपळ, ती धगधग समोर आली
आता परत सगळं तेच करायचं होतं
तेच मन मारून जगणं,
मन कासावीस झालं
मी मनाशीच विचारलं
काय रे बाबा तुला शहरात जाऊन काय असं नवीन मिळलं
आतून काहीच उत्तर नाही आलं
फक्त गाडीचा आवाज, धावणारा रस्ता, अनोळखी चेहरे
मनामध्ये उत्तर नसलेले १०० प्रश्न,
शहरात सुखरूप पोहोचलो, ४ दिवसात जे जे झालं ते आठवतं शांत झोपून गेलो
सकाळ झाली सगळं आवरून मी ओफिसला गेलो
झाली काय रे सुट्टी घेऊन आता टारगेट वर फोकस कर अशी हाक कानी आली
त्यात त्यांची काहीच चुक नाही
कारण शहरात राहणारा प्रत्येक जन हेच जीवन जगतो याची जाणीव मला आली
गजबजलेल्या त्या ओफिस मध्ये कोणीच कोणाचं नसतं
फक्त तुमच्या कडून काही काम असेल तर मग भावाचं नातं असतं
स्वार्थानं भरलेल्या या शहरापेक्षा मला माझं गावच कित्येक पटीने बरा वाटतो
चार पैसे कमी मिळेना पण माणूसकीची जाण अन् आपलेपणाची खाण सोबत घेऊन तिथला प्रत्येक जन सूखात राहतो
म्हणूनच म्हणतो
गावाकडे पैसा कमी म्हणून
मन माझे शहराकडे वळले
कितीही काही झालं तरी सुख गांवातच असतं
मला हे थोडं उशीरा कळले,
कवी अक्षय चौगुले
- ही कवीता त्या प्रत्येकासाठी ज्याला गांव सोडून शहरात यायचं आहे
टिप्पणी पोस्ट करा