संत गाडगेबाबा
![]() |
Image Source - Google | Image by - sgmmhingna |
डोक्यावर झिंज्या
अंगावर चिंध्या
हातात गाडगे
ध्यान असे ||१||
हातात खराटा
ओठात गोपाला
मन आणि गाव
स्वच्छ करी ||२||
देवळात नाही
दगडात नाही
माणसात देव
सर्वा सांगे ||३||
घुमता गजर
गोपाला-गोपाला
धावे सर्व जन
किर्तनास ||४||
रंगुनी किर्तनी
उपदेश करी
विसरुनी भान
नाचू लागे ||५||
रंजले गांजले
आपले म्हणूनी
अपंग-अनाथांनाही
प्रेम दिले ||६||
चरणास स्पर्श
कुणाचा न झाला
असा थोर संत
होणे नाही ||७||
टिप्पणी पोस्ट करा