बिन नावाची नाती

गणगोत्र सारे येतील अन पित्र जाती 
सोडून जातील बिन नावाची नाती

नात्यागोत्याचा करुनी गुंता , गाठ सोडावया देती 
पिंजून काढतील कुळ आपले , पाठ न सोडती

 बेगडी जमात हि सावज हेरण्या येतील घरी 
हर्ष वदने करुनी मोह पिसारे फुलवतील मनी 

मोहपाशाचे आडाखे मांडूनी चक्रव्हुहात गोवतील 
त्यांचेच गडी त्यांचेच राज्य आपल्याला अभिमन्यु बनून सोडतील 

                               कवी (कमलेश पाडळकर)






1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने