पहिल्या पावसापरी येना तू ...

Image Source - Google | Image by - clickinmoms

धुक्यापरी नभ भोवती घेऊनी
कधी हलकी हलकी एक सर होऊनी
वाऱ्यासोबती गारवा घेऊनी
ओले थेंब सारे ते ओझळीत भरूनी
येना तू 
पहिल्या पावसापरी
पहिल्या पावसापरी येना तू

सरीवर सरी हया रोज कोसळाव्या
धुंद बेधुंद त्या तुलाच स्पर्शनाऱ्या
नवी हिरवळ होऊनी, गुलाबी गारवा घेऊनी
अनोखी नशा ही होऊनी, कधी ये शहारे घेऊनी
येना तू 
पहिल्या पावसापरी
पहिल्या पावसापरी येना तू

एक सांज अशीही यावी, त्यात उन-साउलीची घट्ट मैत्री व्हावी
तेव्हा सोबतीस तू असावी, अशातच एक पावसाची सर यावी अन तुला ती चिंब भिजवून जावी.
तुझे ओले केस सुकविन्या तू तुझे केस झटकावे
त्याच क्षणी तुझ्या केसातले थेंब गाली माझ्या पडावे  आणि त्या थेंबात मी चिंब भिजून जावे
असेच कधीतरी 
येना तू 
पहिल्या पावसापरी....

कवी-सुरज शिवाजी लाटणे






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने