भक्तीची भुकेली विठू माऊली, संतावरी मायेची सावली 

  
Image Source - Google | Image by - clipartstation
ज्ञान माऊली ज्ञानेश्वरी 
ज्ञान सर्व जगाला दिले 
भक्तीची दिंडी पताका 
आळंदी पंढरपुरी चाले 
भक्तीची भुकेली विठू माऊली, संतावरी मायेची सावली||एक||
कृष्ण विष्णूरूपे विठ्ठल 
ठेउनी कटेवरी हात 
पुंडलिके करती माय पिता सेवा
भक्तीवर त्याने केली मात 
भक्तीची भुकेली विठू माऊली, संतावरी मायेची सावली||दोन||
गोरोबाने केली सेवा 
पर्वा नाही तान्हुल्याची 
तल्लीन होई विठ्ठल भजनी 
कुडी आणिली सानुल्याची 
भक्तीची भुकेली विठू माऊली, संतावरी मायेची सावली||तीन||

रामकृष्ण दैवत गेले 
करुनिया आपुले कार्य 
विचलित न होवो मन 
द्यावे भक्ती करण्याचे धैर्य 
भक्तीची भुकेली विठू माऊली, संतावरी मायेची सावली||चार||

वारकरी:- श्री विश्वनाथ ग. पाडळकर







Post a Comment

थोडे नवीन जरा जुने