दिंडी 

Image Source - Google | Image by - wikipedia


दिंडी चालली चालली, भजनात रंगली रंगली 
भक्तांची संसाराची स्वप्ने इथे भंगली 
नाही कशाची आठवण ,घरच्यांची नाही भेटवण ||एक||

पंढरीची वाट सरते ,विठाई हृदयात साठते 
हरी नामाची टाकता पाऊले, कधी पंढरी येईल वाटते 
दिंडी चालली चालली, भजनात रंगली रंगली ||दोन||

आली पंढरी पंढरी, लागली नामदेव पायरी 
भक्त करती माऊलीच्या दर्शन अन मनाची तयारी
दिंडी चालली चालली, भजनात रंगली रंगली ||तीन||

माऊली दर्शन घेता, पूर्ण हृदयी समाधान आता 
दिंडी द्वादशी परतली ,पुन्हा संसारी गुंतली गुंतली 
दिंडी चालली चालली भजनात रंगली रंगली  ||चार||


वारकरी:- श्री विश्वनाथ ग. पाडळकर 







Post a Comment

थोडे नवीन जरा जुने