Image Source - Google | Image by - Shital06

विठ्ठलाच्या भेटी 
मन धाव घेई ,
म्हणूनिया आलो 
पायी घाई घाई ||एक||

माऊलीची माया
तिला अंत नाही ,
लेकरू ओढीने 
तिच्या मागे जाई ||दोन||

ऊन पावसाची 
तमा कुणा नाही 
विठ्ठल भेटीची 
ज्याला ज्याला घाई ||तीन||

टाळ मृदुंगाचा 
नाद घुमे राणी ,
माऊली माऊली 
नाद घुमे कानी ||चार||

कवी - प्रा. सदाशिव गुंडू कुंभार







1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने