Image Source - Google | Image by - Shreeram Ghaisas

वारकरी चाले पंढरीची वाट
घेउनी पताका खांद्यावर ||एक||

विसरुनी सारी , भूक आणि तहान 
करीती गजर ,विठ्ठल विठ्ठल ||दोन||

विठूचे दर्शन , मनाची आस 
उन्हापावसाची , तमा न त्यास||तीन||

टाळांचा गजर , मृदुंगाची साथ 
अभंगात येई , गोडी अवीट||चार||

विसरुनी सारी , नाती गोती 
नाम्या, तुक्याचे ,गाती अभंग ||पाच||
 

कवी - प्रा. सदाशिव गुंडू कुंभार






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने