c
CSC सेन्टर आणि आपले सरकार केंद्र हे दोन्ही एक आहेत कि वेगळे आहेत ?
आपले सरकार हे पोर्टल महाराष्ट्र् सरकारच्या ( Maharashtra Information Technology Corporation) अंतर्गत येते व त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी सर्व सरकारी (Government services) सेवा पुरवल्या जातात.
CSC सेंटर साठी लागणारी पात्रता
१) अर्जदार भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे
२) शिक्षण कमीत कमी १०वी पास
३) आधार कार्ड असणे आवश्यक
४) पॅन कार्ड असणे आवश्यक
५) वय कमीत कमी १८ वर्षे पूर्ण
६) बँकेमध्ये सेव्हिंग अकाऊंट असणे गरजेचे आहे
CSC VLE २०२१ रेजिस्ट्रेशन प्रोसेस व त्यास लागणारी कागदपत्रे (Documents)
१) TEC ( Telecentre Entrepreneur Course ) सर्टिफिकेट
२) अर्जदाराचा फोटो
३) आधार कार्ड (मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
४) ई-मेल आयडी
५) बँक पासबुक/कॅन्सल चेक(सेव्हिंग /करंट अकाउंटचा)
TEC (Telecentre Entrepreneur Course) साठी रेजिस्ट्रेशन प्रोसेस
TEC (Telecentre Entrepreneur Course ) सर्टिफिकेट नंबरसाठी तुम्ही http://www.cscentrepreneur.in/login या लिंकवर जाऊन Certificate Course in Entrepreneurship (CCE) या कोर्स साठी रजिस्टर करावे. या कोर्सची फी १४८० रुपये आहे तुम्ही कोर्ससाठी रेजिस्टर केल्या नंतर तुम्हाला जो लॉगिन आयडी मिळतो तोच तुमचा TEC सर्टिफिकेट नंबर असतो तुम्ही तो नंबर टाकून CSC चे अॅप्लिकेशन करू शकता व अॅप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही कोर्स पूर्ण करून परीक्षा देऊन सर्टिफिकेट प्राप्त करू शकता.
CSC VLE २०२१ रेजिस्ट्रेशन प्रोसेस
१) सर्वात प्रथम तीन पर्यायापैकी CSC VLE हा पर्याय सिलेक्ट करावा . नंतर आपला TEC नंबर टाका आणि अर्जदाराचा मोबाइल नंबर व captcha टाकून सबमिट करा.
२) दुसरया स्टेप्स मध्ये काही बेसिक माहिती भरा जसे की तुमचा ई-मेल आयडी इत्यादी आणि सबमिट करा.
३) तिसरया स्टेप्स मध्ये तुम्हाला OTP साठी दोन पर्याय दिसतील ई-मेल व मोबाईल. त्यामधला मोबाईल हा पर्याय सिलेक्ट करा आणि सेंड OTP वरती क्लीक करा (मोबाईल पर्याय निवडा कारण आपल्या आधार कार्डला ई-मेल लिंक असेल कि नाही हे बरयाच जणांना माहित नसते . पण सर्वांच्या आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असतो व OTP हा आधार कार्डला जो नंबर व ई-मेल लिंक आहे त्या वरती OTP येतो ).
४) अर्जाच्या चौथ्या आणि शेवटच्या स्टेप मध्ये आपल्याला आपला फोटो अपलोड करावा लागतो त्यानंतर KISKO NAME टाकावा लागत (किसको नाव(KISKO NAME) म्हणजे आपल्या शॉप चे नाव किंवा तुम्ही जे CSC सेंटर ला नाव देणार आहात ते), आपल्या सेंटर किंवा शॉपचा संपूर्ण पत्ता टाका व Longitude And Latitude मॅप वरती पिनपॉईंट च्या साह्याने दाखवा (Longitude And Latitude म्हणजे तुमच्या सेंटरचे/शॉपचे लोकेशन मॅपवरती दिसण्यासाठी तुम्ही गूगल मॅपची मदत घेऊ शकता ), तुमच्या भागातले पोलीस स्टेशन सिलेक्ट करा , अर्जदाराचा पॅन नंबर टाका त्यानंतर अर्जदाराचे बँक डिटेल्स टाकून बँक पासबुक/कॅन्सल चेक अपलोड करा व शेवटी आधार कार्ड अपलोड करून अर्ज सबमिट करा.
५) अर्ज सबमिट केल्यानंतर एक रेफेरेंस नंबर(Application Reference number ) जनरेट होईल त्याची प्रिंट काढून त्या बरोबर पॅन कार्ड ,आधार कार्ड, बँक पासबुक/कॅन्सल चेक यांची झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड (Self attested) करून CSC च्या जिल्ह्याच्या मॅनेजरकडे सबमिट करा .
ऑनलाईन अर्ज भरतेवेळी अपलोड (upload) करण्यासाठी लागणारी कागदपत्रे व त्यांची साईझ
१) आपल्या फोटोची स्कॅन कॉपी ही १० - २५ kb इतकी साईझ असणे आवश्यक आहे जर यांच्या पेक्षा जास्त किंवा कमी असेल तर फोटो अपलोड होणार नाही .
२) बँक पासबुक/कॅन्सल चेक (३०-१०० kb साईझ )
३) आधार कार्ड (३०-८० kb साईझ)
अॅप्लिकेशन/अर्जाचे स्टेटस कसे चेक करायचे ?
अॅप्लिकेशन स्टेटस चेक कारण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://register.csc.gov.in/register/status आणि तुमचा अॅप्लिकेशन रेफेरेंस नंबर टाकून त्याचे स्टेटस चेक करा.
अॅप्लिकेशन किती दिवसात अप्रूव्ह होते ?
CSC च्या नियमाप्रमाणे अॅप्लिकेशन अप्रूव्हच्या प्रोसेसला जास्ती जास्त ४५-६० वर्किंग दिवस लागतात. या दिवसामध्ये तुमचे अॅप्लिकेशन अप्रूव्ह झाल नाही तर तुम्ही CSC च्या हेल्पडेस्क ला मेल करा helpdesk@csc.gov.in किंवा त्यांना ट्विटर वरती ट्वीट करा तुम्हाला तुमच्या अॅप्लिकेशन स्टेटसबदल संपूर्ण माहिती मिळेल (मेल आणि ट्वीट करताना अॅप्लिकशन रेफेरेंस नंबर टाका ).
अप्लिकेशन आयडी मिळाल्यानंतर पुढील प्रोसेस ?
पूर्वी अॅप्लिकेशन अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन डिटेल्स सर्व Digi मेल वरती मिळायच्या पण आता CSC कडून DigiMail मेल बंद करण्यात आले आहेत . आता तुम्हाला तुमच्या CSC संधार्बतले सर्व मेल्स तुमच्या रेजिस्टरड मेल आयडी वरती प्राप्त होतील.
CSC आयडी प्राप्त झाल्यानंतर तुम्ही या लिंक https://register.csc.gov.in/myaccount/login वरती क्लिक करून फिंगरप्रिंट) FINGERPRINT किंवा IRIS स्कॅनर स्कॅन करून अॅप्लिकेशन सबमिट करा .त्यानंतर तुमचा CSC आयडी ऍक्टिवेट होईल. पुढील प्रोसेस पूर्ण करण्यासाठी CSC च्या डिस्ट्रीक मॅनेजर ला संपर्क करा.
CSC सेंटर सेटअप साठी लागणारे साहित्य
१) लॅपटॉप/डेस्कटॉप (With Windows10 operating System)
२) प्रिंटर All in one(Colour / Blank & White )
३) इंटरनेट कनेकशन
४) Fingerprint Scanner
५) UPS बॅकअप कमीत कमी ४ तास
CSC (Common Service Centre ) मध्ये या सेवा तुम्ही देऊ शकता
१)Government to Citizen
- Bharat Billpay:- it is one stop bill payments platforms for all bill payments (Electricity, Mobile, Landline, Broadband etc.)
- FastTags
- Passports
- Pan card
- SBA (Swacch Bharat Abhiyan)
- FSSAI
- Soil Health Card
- PMAY (Pradhan Mantri Awas Yojana)
- Election Commission Services
2) Business to Citizen
- Mobile Recharge
- DTH Recharge
3) Financial Inclusion
- Digital Finance Inclusion, Awareness & Access
- ‘VLE Bazaar’ – A rural e-commerce venture
- Skill Development
- CSCs as GST Suvidha Provider
- Banking
- Insurance Service
- Pension Service
- Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY)
4) Education Services
- NDLM-DISHA
- Cyber Gram Yojana
- NABARD Financial Literacy Programme
- Legal Literacy Programme
- CSC BCC Course
- Learn English
- Tally Certied Programme
- Tally Kaushal Praman Patra
- Introduction to GST
5) Agriculture Services
6) Health Services
- Tele-health Consultations
- Pradhan Mantri Jan Aushadhi Scheme
7) Digipay Service
8) E sign
9) Promotion and Protection of Human Rights through CSC BY NHRC
तुम्हाला जर ऑनलाईन अॅप्लिकेशन करताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही आमच्या मराठी व्यासपीठला मेल, फेसबुक ग्रुप, फेसबुक पेज किंवा कंमेंट द्वारे संपर्क करू शकता .
इतर व्यवसायाबदल माहिती व इतर अपडेटसाठी मराठी व्यासपीठशी कनेक्टेड रहा.
टिप्पणी पोस्ट करा