शेवगा

जून महिन्यामध्ये पावसाळा सुरु झाला कि हवामानात अचानक अनेक बदल घडत असतात . या महिन्यात खूप उकाडा असतो. अचानक 

दुपारी ढग दाट दाटून येतात आणि पाऊस सुरु होतो . हा अचानक पडणारा पाऊस निसर्गात गारवा निर्माण करतो . हाच वळीवाचा पाऊस असतो .

त्यानंतर ७ जूनच्या मृगनक्षत्रावर पावसाळा सुरु होतो . पावसाळा सुरु झाला कि शरीरातील क्षारधर्म (बलधातू) अचानक कमी होतो व आम्लधर्म जलद गतीने 

वाढू लागतो .कारण पावसामुळेही निसर्गात आम्लधर्म वाढतो. निसर्गातीलही क्षारधर्म अचानक कमी होतो. शरीराला क्षारधर्माची सवय झालेली असते . 

निसर्गात घडून येणाऱ्या अचानक बदलामुळे शरीरावर त्याचे परिणाम लगेच जाणवतात . शरीर क्षारधर्माची सवय एकदम बदलू शकत नाही . आयुर्वेदानुसार 

क्षारधर्म हळूहळू वाढायला/कमी व्हायला हवा तसेच आम्लधर्मही हळूहळू वाढायला किवा कमी व्हायला हवा.

या अचानक होणारया बदलासाठी शरीर सज्ज करायचे असेल तर " शेवगा " खावा .(भाजी,सूप इ.)शेवगा हा निसर्गत: क्षारधर्मी आहे.

शेवगा खाल्याने शरीरात क्षारधर्म वाढतो.पावसाळा सुरु झाल्यावर क्षारधर्म एकदम कमी होऊ नये यासाठी मृगनक्षत्रावर शेवग्याची भाजी खावी असा 

आयुर्वेदात उल्लेख आहे. शेवग्याची भाजी आम्लधर्मयुक्त पदार्थ पचवण्याची ताकद वाढवते. याचाच अर्थ पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारावर मात 

करण्यासाठी शेवगा वरदानच म्हणावा लागेल.शेवगा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. ही भाजी जून महिन्याच्या अखेरपर्यंत खावी. कारण त्यानंतर 



दक्षिणायन सुरु झाले कि शरीरामध्ये पुन्हा बदल घडतात . आम्लधर्म पचवण्याची शरीराची ताकद निसर्गत: वाढते.

उन्हाळ्याकाढून पावसाळयाकडे जात असताना निसर्गात अनेक बदल घडत असतात. हे दिवस शरीराची बलस्थिती कमी करणारेच असतात.

म्हणून रोग होऊ नये यासाठी आहारात बदल करावा. या काळात रोग होऊ नये व झालाच तर त्यातून रोगमुक्त होण्यासाठी शेवग्याची भाजी आवर्जून खावी.

ही भाजी मृगनक्षत्रावर म्हणजे ७ जूनला खावी .


लेखक- सौ. श्वेता अक्षय भिंगार्डे 




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने