PCOD पॉलिसिस्ट ओव्हरी डिसीज
How to lose weight when you have PCOS?
काय आहे PCOS?
PCOS कमी कसे करावे?
PCOS - Polycystic ovary syndrome.
हा एक कॉमन हार्मोनल आजार आहे .हा एक संप्रेरकाच्या समूळ बिघाडामुळे होणारा साधारण आजार आहे. पण याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो ज्याने गर्भाशय काढण्याची वेळ येते.
सध्याच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात मेंदूवर जास्त ताण,कमी झोप,पॅकेट फूड यामुळे संप्रेरके कमी-जास्त स्त्रवतात. संप्रेरकांच्या असमतोलामुळे हा आजार उद्भवतो.
तसेच २०%स्त्रियामध्ये मेनोपॉझ (मासिकधर्म बंद होणे) च्या काळात हा आजार होतो. अँड्रोजेन नावाचा संप्रेरक जास्त स्त्रवला की संप्रेरकांचा समतोल बिघडतो व PCOS ला सुरुवात होते.
PCOS ची लक्षणे
१) मासिकधर्म २ पेक्षा जास्त महिने लांबवणे.
२) हनुवटीवर दाट काळे केस येणे.
३) ओठांच्या वरच्या भागावर केस येणे.
४) वजन वाढणे
५) शरीर स्थूल होणे.
६) केस जास्त गळणे.
हा PCOS घरगुती उपायांनीही कमी होऊ शकतो.त्यासाठी आपण आपल्या आयुष्यात महत्वाचे ८ बदल करणे गरजेचे आहे.
१) इन्शुलिन कमी स्त्रवणारा आहार घ्यावा. भारतीय खानपानात कर्बोदके जास्त प्रमाणात असतात.उदा. तांदूळ,ज्वारी,गहू इ. असे पदार्थ शरीरामध्ये शर्करा तयार करतात.ही शर्करा संतुलित करण्यासाठी इन्शुलिन हे संप्रेरक स्त्रवते. जर आपण बैठी कामे करत असू, आहार प्रमाणात घेत असू,अगदी मोजून मापून तरीही वजन वाढते. बैठी कामे असताना जर, आपण प्रमाणित जेवणासोबत गोड पदार्थ,गोड सरबत घेत असू तर जास्तीची शर्करा तयार होते. दुसऱ्या बाजूला ही शर्करा संतुलित करणारा इन्शुलिन मात्र तितकाच स्त्रवतो.यालाच इन्शुलिन रेझिस्टीव्हिटी म्हणतात.
- म्हणून pcos कमी करण्यासाठी कमी कर्बोदकयुक्त आहार,कमी शर्करायुक्त आहार घ्यावा. त्यामुळे कमी शर्करा तयार होईल आणि इन्शुलिन त्या शर्करेला संतुलित करू शकेल.
- कमी स्निग्ध पदार्थ (तेलकट) आणि शाकाहारी आहार घ्यावा. हे पदार्थ पचनास हलके आणि पचनशक्ती वाढवणारे आहेत.
- केटो डाएट- या डाएट मध्ये कमी कर्बोदके(carbohydrates),मध्यम प्रमाणात प्रथिने(Protein),जास्त प्रमाणात स्निग्ध(oil)घेतले जातात.भारतीय हवामान व जीवनपद्धतीमध्ये हा आहार फारसा उपयुक्त ठरत नाही.
२) जंक फूड ,चिप्स,कँडी,विकत मिळणारी पेय कमी खावी/टाळावी .
- शरीराची चरबी वाढवण्यासाठी वरील घटकांचा सिहाचा वाटा आहे.
- वरील सर्व पदार्थामध्ये जास्तीची साखर असते .जास्तीची शर्करा शरीरात साठत जाऊन त्याचे रुपांतर मेदात(चरबीत) होते.
- महत्वाचे म्हणजे वरील पदार्थ सतत सेवन करणाऱ्या व्यक्तींना सतत काहीतरी सेवन करण्याची वृत्ती निर्माण होते.
- pcos मध्ये ६०% महिलांमध्ये सतत भूक लागल्यासारखे वाटते.
- वरील पदार्थ पूर्णपणे बंद केले तर pcos कमी होण्यास मदत होते.
- तसेच आहाराच्या वेळा ठरवणे गरजेचे आहे.
३) नियमित व्यायाम-
योग्य आहार आणि वेळेत आहारासोबत व्यायाम खूप महत्वाचा आहे. किमान २०-२५ उठाबश्या(sqats),रोजचे अर्धा तास चालणे, ११ सूर्यनमस्कार हा व्यायाम आठवड्यातील कमीत कमी ४ दिवस तरी करावा.
४) आहाराचे मोजमाप -
योग्य वेळेत आहार घेणे महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर प्रत्येक पदार्थ हा योग्य प्रमाणात घेणेही महत्वाचे आहे. त्यासाठी (न्युट्रीशनिस्ट) कडून डाएट प्लॅन घेणे महत्वाचे. pcos कमी करण्यासाठी योग्य डाएट प्लॅन गरजेचा आहे.
५) मन:शांती -
धकाधकीच्या जीवनामध्ये मेंदूवर सतत ताण असतो.कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला समाधान मिळत नाही. त्यामुळे आपण एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मेंदूवर ताण आल्याने सतत भूक लागते आणि जास्त वेळा खाल्ले जाते. मन:शांतीसाठी ध्यानधारणा,प्राणायाम उपयुक्त ठरतो .
६) पुरेसे पाणी पिणे-
दिवसातून योग्य वेळी तसेच योग्य प्रमाणात पाणी पिणे हे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.
७) डॉक्टरांचा सल्ला-
वेटलॉस ट्रेनिंग व डाएट प्लॅन ने काही फायदा होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
८) वेबसाईटवर दिसणाऱ्या टिप्स टाळाव्या. pcos कमी करणे ही काळाची गरज आहे.pcosअसेल तर मुल होण्यास व्यत्यय येतो. "वेळ मिळत नाही" अशी सबब पुढे करणाऱ्या स्त्रिया इंटरनेटवर औषधोपचार शोधतात. कोणत्याही प्रकारची टेस्ट न करता घरगुती उपाय आणि गोळ्या घेतात. आजकाल आयुर्वेदिक औषधांची जाहिराती मोठ्या प्रमाणात ऑनलाईन प्ल्यॅटफॉर्मवर पाहायला मिळतात. अशा प्रकारची औषधे प्रत्येकाला उपयुक्त ठरतीलच असे नाही. त्यामुळे ऑनलाईन प्ल्यॅटफॉर्मवरील औषधावर भरमसाठ खर्च करण्यापेक्षा, राहणीमानात(lifestyle) किरकोळ बदल केलेत तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
आवश्यक बदल
१) वेळेत झोपणे,वेळेत उठणे.
२) सकस पोषक आहार .
३) एका वेळच्या आहारात अर्धा शिजलेल व अर्धा न शिजलेला (कच्या भाज्या,फळे इ.) आहार घ्यावा .
४) नियमित ३०-४० मिनिटे व्यायाम.
५) स्वत:साठी मोकळा वेळ(मोबाईल विरहीत वेळ)
६) गोड पदार्थ टाळणे.
७) Mind training
८) Motivation व्हिडीओ पाहणे.
धन्यवाद.
लेखक- सौ. श्वेता अक्षय भिंगार्डे
Must Read:- शेवगा औषधी उपयोग
टिप्पणी पोस्ट करा