“तो” आणि “ती”
![]() |
Image Source - Google | Image by - wallpaperflare |
( हलकं फुलकं काही )
पहिलाच दिवस अन वेळही पहिलीच तिची कामावर जाण्याची,
पहिलीच सकाळ त्याची तिला न पाहता चहा पिण्याची
भल्या पहाटे घर आवरून सावरून गेली ती
दारापाशी उभा होता तो, गडबडीत हसून गेली ती
चालत धावतच गेली , धुक्यात विरघळून गेली ती
माघारी फिरला तो तोवर घरातील सारया सजीव वस्त्रू निर्जीव झाल्या होत्या
जणू काही निषेधच करीत होत्या तिच्या वियोगाचा अन विरहाचा
अगतिक म्हणुन स्वयंपाक खोलीत गेला तो
खमंग वास सुटला होता , पदर खोचून उभी होती ती
काहीतरी बनवत होती , त्यातून स्वंताचे केस सावरीत होती
मागून हाक आली , “ पप्पा आम्ही शाळेला जातो “.
दचकलाच तो भास होता तिचा असण्याचा अन अस्तित्वाचा.
मागे वळून पाहतो तोवर मुल दोघे शाळेला जाण्यासाठी फाटकाला
जाऊन धडकली होती जाताना विरह वियोग वाट्याला सोडून गेली ती .
बसला बाहेर सोफ्यावर जरा बदल म्हणुन दैनिक अंक चाळीत होता
वरवरच्या ठळक बातम्या वाचून एका ठिकाणी अडखळला तो
नारीशक्ती , नारी सबलीकरण , स्त्रीयावरील अत्याचार , स्त्रियांनी घराबाहेर पडलं पाहिजे ???
वाटलं त्याला शेवटचा प्रश्नचिन्ह बनून तोच उभा आहे .
व्याकुळतेन त्या प्रश्नालाच प्रतिप्रश्न विचारित होता तो, का पडावं घराबाहेर घरासाठी,
घरापासून दुर ?
घड्याळात दहाचा गजर झाला अन भानावर आला तो
ऑफिसवेळ झाली होती,पाय निघत नव्हता ,घराबाहेर पडला तो
फक्त एकटं घर उरलं होत घराकडे अधिरतेन पाहत होते
“तो” आणि “ती” च्या प्रेमाची घट्ट वीण विनत होते.
टिप्पणी पोस्ट करा