जात पाहिजे 

Image Source - Google | Image by - needpix


कुण्या अभागिने
उकिरडयावर फेकून दिलेला
आणि आश्रमात 
वाढलेला , मी एक
अनाथ मुलगा आहे 

कुणाला तरी दया आली
तेव्हा मला उचलून 
आश्रमात आणून टाकले
तेव्हा मी रडत होतो 
आणि काहीही कळत नव्हते

समज आली तेव्हा
कळायला लागलं 
शिक्षणाच्या ओढीनं
शिकत गेलो 
नकळत वाढतही गेलो 

शिक्षण संपलं आणि 
आश्रमही सुटला
मुक्त झालो , स्वतंत्रपणे 
या अफाट जगात 
फिरण्यास बाहेर पडलो

गठ्ठा कागदपत्रांचा 
आश्रमात वाढलेल्या 
शिकलेल्या दिवसांचा 
सोबत घेऊन 
नोकरीच्या शोधात निघालो

वण वण फिरलो
कुठेच काही जमेना
तेव्हा पोटाचा प्रश्न आला
म्हणून हॉटेलचा आसरा
घेऊन राहू लागलो

सेवायोजन कार्यालयात 
नोकरी मागण्यासाठी गेलो
स‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‍टिैफिकेटचा गठ्ठा पाहून
सर्वजण खूष झाले
म्हणाले ,हो फारच छान!

सर्व काही ठीक आहे 
व्यक्तिमत्व मस्त आहे 
फक्त तुमचे जातीचे
स‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‍टिैफिकेट सादर करा 
तूमचे काम फत्ते झाले

डोळ्याला अंधारी आली
जात आता कुठून सांगू
कारण मी कोण , कुणाचा
माझं मलाच ठाऊक नाही

नोकरीसाठी जात पाहिजे
मग ती कोणतीही असो
फक्त नावापुढे जोडण्यासाठी 
कुणीही द्या,कोणतीही द्या 
फक्त मला जात पाहिजे 

कवी - प्रा.सदाशिव गुंडू कुंभार





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने