घरटं
![]() |
Image Source - Google | Image by - pickpik |
बिचारा चिमणा
घरटं बांधू लागला ,
प्रत्येकजण त्याचा
हेवा करू लागला
एकजण म्हणाला
एवढं मोठं कशाला
दुसरा म्हणाला
एवढं जमेल का तुला
शेजारी-पाजारी
सगळे बसले दडून ,
पाव्हणे -रावळे
गेले दूर दूर निघून
जिद्दी चिमणा
जिद्दीने बांधू लागला घरटं,
सगळ्याकडे त्याने मग
मुद्दामच कानाडोळा केला
घरटं झालं पुरं तेव्हा
बोट तोंडात गेली त्यांच्या ,
सगळे धावून आले
अन मंडळी निरुत्तर झाली
टिप्पणी पोस्ट करा