मी पुरग्रस्त

Image Source - Google | Image by - Wikimedia Commons


बस झाल वरूनराजा 
अजुन किती तांडव करशील ??
निरागस जीवांच्या मृत्युच्
 कुठ पाप फेडशील ??

ओढा नाले नद्यांसह 
भरवस्त्यानाही तुझी झळ लागली
तू येण्याची वाट पहणाऱ्यानाही 
आता तुझी भीती वाटू लागली..

आई म्हणवनारी गंगा सुद्धा
तुझ्यामुळेच क्रूर वागली
डोंगर कपारीची सभ्य वाट सोडून
थेट घरात घुसु लागली

जीवनदायी म्हणवणाऱ्यानच
 का ? अस जीवावर उठाव...
तुझी याचना करणाऱ्याना
तू थेट घरीच येऊन गाठाव..?

काय मिळवलस तू ??
अस विक्राळ रूप आणून...
अश्रु सुद्धा आता वाहत नाहीत तुझी व्याप्ती वाढेल म्हणून....

तुझ्या रौद्र प्रलयाच्या भीतीनं 
काहुर मनात उठलय...
दावनिच्या जनावराच हंबरन मात्र 
माझ्या कानात साठलय...

तुझ्या कोसळणाऱ्या सरीनी 
आता थोड़ी उसंत घ्यावी...
मुकया भाबड्या जनावरांची 
किमान दावी रिकामी करावी...

तूच पुन्हा विचार कारावास 
तुझ्या अश्या या वागन्यावर...
तुझ्या हट्टाचा परिणाम काय होत असेल ??
अबालवृध्धांच्या जगन्यावर....

असाच बरसलास धो धो ..तर..
आता तुझी भीती वाटनार नाही...
तुझ्याशी दोन हात करायला आता
आम्ही मागे हटनार नाही...

खुप सारी सुखं आणि दुःखही दिलीस....
तू जा आता निघून....
ये पुन्हा पुढील वर्षी आनंदान 
माझा पाहुनचार बघून.....


लेखक - प्रसाद शेडे..




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने