शिक गड्या शिक रं ,वाचायला शिक ,
दिलेलं काम गडया पुरं तू कर ,
पुरं तू कर,पुरं तू कर !
Image Source - Google | Image by - pxhere.com |
ज्ञानानं भरलया , जग हे सारं ,
त्यात बुडी मारून ,मोती तू काढ !
नगं नगं म्हणू तू ,कामाला लाग
कंबर कसून ,काम तू कर रं ,
हयगय नगं करू , नेट तू धरं रं ,
नाही जात यश कुठं , पाठी तुझ्या हाय रं
वाचनानं होईल ,मन तुझं मोठे ,
कळलं गडया तुला , माणसाची रीत ,
होशील माणूस खरं , माणसास वाच रं
ज्ञान हे पवित्र गड्या , अमृत हाय रं ,
ज्ञानाबिगर नाही , या जगात मान रं ,
विद्धेनेच होशील , मोठा तू जाण रं
मनन-चिंतन , हवं तेवढं कर रं
भलतं सलतं विचार ,नको मनात आणू रं
मन मोठं कर तू , मिळेल सारं रं
कवी - श्री. सदाशिव गुंडू कुंभार
Khup chan
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा