कोरोना
कुठून आला कसा आला
त्याची आता चर्चा नको
दोन हात करू त्याच्याशी
त्याशिवाय उसंत नको
![]() |
Image Source - Google | Image by - danville |
घरात बसावे दारात बसावे
विनाकारण गर्दीत नसावे
संपर्कासाठी सुरक्षित
दोघात अंतर ठेवावे
बाहेर जाताना मास्क लावा
नाहीतर रुमाल लावा
जाता येता बाहेरून
हात पाय स्वच्छ धुवा
खोकताना ,शिंकताना
रुमाल जरूर धरावा
जसा आपला जीव आहे
तसा दुसरयाचा समजावा
कोरोना संकट लय भारी
सगळे मिळून लढायचं
काळ मोठा कठीण आहे
मागे नाही हटायचं
टिप्पणी पोस्ट करा