![]() |
Image Source -Google | Image by - clipartstation |
संसाराच्या जंजाळात
माय माझी वाढलेली
गरिबीच्या चटक्यानं
रया निघून गेलेली
काम करुनिया खाणे
आणि समाधानी होणे ,
आभाळाच्या छायेखाली
क्षणभर विसावणे
थंडी अन ऊन वारा
कधी नाही थांबलेला ,
झेलूनिया कष्ट सारे
महापूरातही वाचली
खाऊपिऊ घालताना
केली नाही हयगय
गाय जशी गोठ्यातली
तशी होती माझी माय
सपनात माझ्या
माझी माय आली
खेमकुशल विचारून
हळुवार निघून गेली
जाता-जाता,बोलते कशी
दुःख देऊ नका कुणाला ,
हातामध्ये हात
घालूनिया चाला
Good
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा