परकं नात
![]() |
Image Source - Google | Image by - pikist.com |
धुळीनं वाऱ्याचे पंख
एक नातं जोडलं
पाखरासारखं उडायच्या नादात
जमिनीशी असलेले अस्तित्वच सोडलं
वाऱ्याच्या बळावर धुळीला
आकाश गाठायचं होत
पावसाच्या सरींना तिला
पायाखाली तुडवायच होत
वाटलं पाण्यासारखं वाहणं
तिच्या जीवनात राहिलं
गोठलेल्या गारातही
अर्ध आयुष्य वेचलं
सरी दवडून गेल्या
गारा वितळून गेल्या
जाता जाता धुळीच नात
जमिनीत जिरवून गेल्या
Good
उत्तर द्याहटवाMast..👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा