अलीकडेच हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने केलेल्या आत्महत्येनंतर हा प्रश्न अनेकांना सतावत असेल , मी काही मानसोपचार तज्ञ नाही पण नक्की काय असतं ते सांगतो,

Image Source - Google | Image by - deccanchronicle

          जुलै २०१९ मध्ये मला नुकतंच नोकरीच्या ठिकाणी मुद्दाम डावलले गेल्यामुळे मानसिक तणाव होता त्यात माझी M.S ची शेवटची परीक्षा २ महिन्यावर आली होती त्यामुळे विशेष वाटलं नाही पण डावलले गेलोय याची चीड आणि खंत मात्र होती. मी सरळ बॅग भरली आणि कर्नाटकात कॉलेज जवळ मित्रांसमवेत राहू लागलो. M.S ची अंतिम परीक्षा असल्याने त्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यात दोन्ही वर्षाची फी भरू शकलो न्हवतो मित्रांनी ऐनवेळी धोका दिला आणि शेवटची परीक्षा असल्याने कॉलेज अर्थात फॉर्म भरू देणार नाही हे आणखी एक टेन्शन त्यातच पूर्ण वर्ष नोकरीमुळे तितका अभ्यास करू शकलो न्हवतो. त्यामुळे आता २ महिन्यातपूर्ण अभ्यास करावा लागत होता. 
Image Source - Google | Image by - kearsleyeclipse.com

          कर्नाटकात रूम वर अभ्यास करत होतो बऱ्यापैकी अभ्यास होत आला पण अचानक मला तरी स्वप्न पडायला लागली. थोडी भीतीदायक होती. दिवसभर वाचन करत असे मात्र दिवसभरात पुन्हा या सर्व गोष्टींचा विचार मनात सुरू असायचा . जेवण करून रात्री झोपलो की काही सेकंदात स्वप्न पडायची . हळू हळू खूपच भयानक स्वप्न पडायला लागली मात्र ति सकाळी कोणाला सांगता यायची नाहीत किंवा त्या स्वप्नांचं वर्णन करता येत नसायचं त्यामुळं चिडचिड व्हायची. मग मी रात्री उशिरा झोपून सकाळी उशिरा उठायला लागलो आणि दिवसा थोडी झोप घ्यायचं ठरवलं...माझ्या बेड चाय डाव्या आणि उजव्या बाजूला त्यांच्या बेड वर दोन्ही मित्र अभ्यास करत असायचे किंवा झोपलेले असायचे .
Image Source Google | Image by - manojbareth 


           ८ दिवसानंतर मी झोपलो आणि काही क्षणातच कित्येक किलोमीटर अंतरावरून प्रचंड मोठा आवाज यायला लागला हळू हळू तो आवाज वाढत जायला लागला तो प्रचंड आवाज माझ्या उजव्या कानात शिरला आणि मेंदू भोवती तो आवाज फिरत राहायला लागला ... मला तो आवाज सहन होत न्हवता मी खूप मोठ्याने ओरडत होतो पण माझा आवाजच घशातून फुटत न्हवता ... 

मला असह्य व्हायला लागलं मेंदू फुटतोय की काय असं वाटत होतं ... पण तो ही फुटेना ... फुटला असता तर मी सुटलो असतो कदाचित .... हळू हळू आवाज कमी होत गेला ... माझ्या मेंदूतून बाहेर पडला ... पुन्हा मोठा आवाज .... तो आवाज आता खूप वेगाने एका दिशेने जात होता .... अन मी सुद्धा अलगद त्याच वेगाने त्या आवाजासोबत जात होतो ... इतका प्रचंड वेग ... इतका की मी कधी इतका वेग कोणत्या चित्रपटात सुद्धा बघितला  न्हवता ...शेकडो किलोमीटर प्रवास होत असताना मला चक्कर येत होती पण सांगणार कोणाला ?? ऐकणार कोण ??? माझं माझ्यावर नियंत्रण न्हवतं .... अचानक समोर मोठा पर्वत .... मोठा खडक .... त्या खडकावर त्याच वेगाने जाऊन आपटणार या भीतीने हात पाय गळाले .... आणि आपटलो .... अन मला जाग आली .... शेजारी बघतोय मित्र दोन्ही पण झोपलेत ....
Image Source - Google | Image by - wallpaperflare.com

             मी डोळे मिटायचा प्रयत्न केला ... पुन्हा सुरू झाला आवाज ...माझ्या डोळ्यासमोर काही फुटांवर प्रचंड आवाज .... मी एका मोकळ्या माळरानावर उभा आहे .... आता तो आवाज स्थिर होता पण खूप मोठा होता ....मला सहन होत न्हवताच .... पुन्हा मेंदूला ताण बसला ...तो आवाज माझ्या भोवती गोल गोल फिरायला लागला .... काही क्षण कित्येक मिनिटं .... गोल गोल फिरायला लागला ... 
अन मी त्या आवाजासोबत गोल फिरायला लागलो .... मला त्रास होतोय .... सगळं शरीर कोणी तरी पिळून काढतंय असं वाटायला लागलं.... त्या प्रचंड आवाजा सोबत मी पुन्हा उंच गेलो ...अन एका मोठ्या दरीच्या कड्यावरून फेकलो गेलो .... खाली अस्पष्ट दिसणाऱ्या झाडात ... दगडावर आपटलो जाणार या भीतीने घाम फुटला .... तितक्यात पुन्हा जाग आली .... 

           सकाळी उठलो तर काहीच आठवत नाही ....सकाळची वेळ मित्र दोन्ही वाचन करत होते 
मग झोप झाली न्हवती म्हणून मी पुन्हा झोपलो ....डोळे मिटतोय तोच पुन्हा आवाज ना कोणती व्यक्ती दिसत होती ना आकृती .... मात्र मला त्या स्थितीत आधार वाटायला लागला कारण माझ्या दोन्ही बाजूच्या बेड वर मित्र बसलेत वाचन करत ....पण आवाज येतोय .... मी झोपून आहे .... झोपलेल्या स्थितीत कोणीतरी प्रचंड दाब देतंय मेंदूवर ..... आता श्वास सुद्धा घ्यायला त्रास होतोय ....माझ्या डोक्यात कोणीतरी हात घातलाय मेंदू हातात धरून पूर्ण ताकदीने पिळून काढत आहे .... मला प्रचंड वेदना होत आहेत .... मला सहन नाही होत .... बाजूला बेड वर मित्र दिसत आहेत त्यांना आवाज देतोय ...खूप मोठ्याने .... गणेश अरे बघ मला काय होतंय ....अमन तुला तरी ऐकू येतंय का ???  यांना ऐकायला का जात नाही माझा आवाज .... अन तितक्यात मला जाग आली .... ! 
           जशी जाग आली तसं गणेशला सांगून टाकलं स्वप्न .... कारण काही सेकंदानी त्या स्वप्नांचं विस्मरण व्हायचं ....! मी त्याला विचारलं , यार मला काही झालं असेल का ??? मला इतका त्रास का होतोय ..? त्याने सांगितलं, काही झालं नाही तू आराम कर ....! 

         त्यानंतर पुन्हा मला झोपलो की पुन्हा आवाज वेगवेगळी स्वप्न .... आता मला झोपेची भीती वाटू लागली होती .... डोळे मिटले की लगेच ... सुरू व्हायचं....! मी २-३ तज्ञ डॉक्टर मित्रांसोबत बोललो याबद्दल ...त्यांनी सगळी माहिती विचारून घेतली ... अन सांगितलं .... तुला काही झालं नाही फक्त डिप्रेशन असल्यामुळे असं होत आहे .... मानसिक तणाव असल्यामुळे असं होतं .... एक काम कर ... परीक्षा ६ महिन्यांनी दिली तरी चालेल ... काही फरक पडत नाही ... शांत तुला आवडेल अश्या ठिकाणी जा .... सगळा विचार सोड ..... तू सध्या शून्य आहेस आणि आता सुरवात करणार आहे असा विचार करून तुझ्या आवडीच्या गोष्टी कर.... मला टेन्शन आलं एकदाही फेल नाही झालो त्यामूळे माझं कोणतं वर्ष वाया नाही गेलं आजवर अन आता ६ महिने जाणार ....

          सहा महिने वाया गेले तरी चालतील ...पण तणावमुक्त परीक्षा देऊ असा विचार करून बॅग भरली मित्रांना सांगितलं जातोय ... ते आग्रह करत होते परिक्षा दे म्हणून ... पण टाळलं आणि तळकोकणात गेलो ... तिथं जॉब सुरू केला ...समोर सुंदर समुद्र किनारा होता .... छान गाणी ऐकायचो ... जॉब चालूच होता ... मात्र या काळात मी एकही कविता लिहू शकलो नाही ...किंबहुना त्यानंतर कित्येक महिने काही लिहायला सुचलं नाही पण जगायला शिकलो ...! 
वक्त ने कहा , और एक बार धोका खाओगे ???? 
मैने मुस्कुराते हुये बोला, फर्क नहीं पडता जनाब 
ठोकर खाकर चलना सिख लिया हैं मैनें .....!    

टीप- मी ४-५ दिवसात तणावमुक्त झालो ... सुशांतसिंग रजपूत ने कोणत्या तरी चित्रपटात डिप्रेशन मधून बाहेर कसं यायचं सांगितलं मात्र तो स्वतः येऊ शकला नाही ....मी डिप्रेशन मधून बाहेर आल्यावर हे लिहलं आहे ....त्यामुळं यातील योग्य तितकंच घ्या ...!  


लेखन- डॉ शहाजी मोटे-पाटील






1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने