रानावरी आस
ढगांची चवड करून बांधलं गाठोड
सुटल शिदोरी भिजलं शिवार
कूस उजुवूनी धरणी व्याली
बीज अंकुरले रान डोहाळे पुरवती
नव्या नवलाईची पिकं बाळसे धरली
बारशाची लगबग पाऊस पावले दुडदुडली
अंगणी लक्ष्मीची आरास धान्याची रास
शेतकऱ्याच काळीज जडलं रानावरी आस
Very good
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा