आला श्रावण

Image Source - Google | Image by - flickr

आला श्रावण श्रावण
नभ मेघांनी दाटले 
पाठशिवणीचा खेळ
ऊन-सावलीचा चाले

आला श्रावण श्रावण
सप्तरंग उधळले 
पक्षीगणांनी गगनी 
सप्तसूर झंकारले 

आला श्रावण श्रावण
हिरवे गालिचे दाटले
उभ्या पिकांनी रानात
तुरे मस्तकी खोविले

आला श्रावण श्रावण
टाळ मृदंग गर्जले 
भक्तीगणांनी मंदिरी 
भक्तीरस आळविले

कवी - प्रा.सदाशिव गुंडू कुंभार





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने