अरे बेडका
![]() |
Image Source - Google | Image by - maxpixe |
मीच शहाणा,मीच शहाणा
असं ओरडून सांगू नकोस
शेरास सव्वाशेर ,जगी आहेत
हेही तू,विसरू नकोस......
डबक्यातल्या पाण्यातच
खाली-वरती होऊ नकोस,
डोकावून जरा बघ बाहेर
जग आहे,किती सुंदर.......
धाव तूझी ,आहे किती
ठाऊक आहे,सगळ्यांना
लांब ऊडी घेऊ नकोस
मजा दिसेल सगळ्यांना.........
मनी आहेस फार तू
मानित नाहीस कुणाला
हेच अडतं अन तू
दडी मारतोस एकदाचा.........
शहाणपणाचा तोरा तू
हंगामातच मिरवतोस
हंगाम निघून जाताच तू,
मिटून डोळे गप्प पडतोस.........
Good
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा