गोतावळा
![]() |
Image Source - Google | Image by - commons wikimedia |
डोळ्यात प्राण आणून
तात बघतात वाट
गैरसमजाने थोड्या
नात्यात पडते फुट
राहिलेत थोडे दिन
मिळू दे आनंद त्यांना
मुला नातवांचे सुख
हवे वाटते सर्वांना
आप्तस्वकियांचे नाते
असते कसे सुरेल
पागोळ्यातील पाण्याचा
जसा कानी येतो ताल
रुसावे,फुगावे,परि
वैर मनात नसावे
जाणून संसार अर्थ
खेळीमेळीने जगावे
कुणी ना कुणाचे जगी
जरी असले हे खरे
तरी अंती रडणारा
गोतावळा येतो बरे
टिप्पणी पोस्ट करा