Image Source - Google | Image by - wallpaperflare

होऊनी फुलपाखरू मन झेप घेई आकाशी..
उधळीत रंग प्रेमाचे हरवूनी जाई नभाशी..
शोधीत तुझी वाट पद चालती निरंतर..
तुझ्या प्रीतीच्या वाटेवर पुष्प सुवास सुंदर..
आठवता तुझा तो हसरा सुंदर चेहरा..
मनी दरवळतो नित्य तो माळलेला गजरा..
चंचल ते नयन अन पापण्यांच्या पहारा..
पाहता हळूच जेव्हा बावरती त्या नजरा..
पावसात भिजूनी जेव्हा मुखडा तुझा  साजरा..
मंद गाली हसतो चेहरा तुझा लाजरा..
न बोलता काही नजरेचा खेळ सारा..
नाजूक स्वर छेडती  आठवणींच्या तारा..
             

कवी -विजय कोर्सेगावकर




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने