![]() |
Image Source - Google | Image by - pinterest |
नभी पावसाची चाहूल लागली कि मन उदास होतं..
आठवणींपासून दूर जायचं कस या विचारात बुडून जातं...
मार्ग कोणता सापडत नाही अन पाऊस मात्र पडत नाही..
वेदनेच्या विळख्यातून मोकळीक काही मिळत नाही..
पुन्हा पावसाची ओढ लागते आणि डोळ्यात अश्रूंचा घेराव होतो...
निःशब्द अशा मैफलीने मग एकांताचा ठाव घेतो..
पाऊस पडू लागतो..
नभातूनही आणि डोळ्यातूनही...
टिप्पणी पोस्ट करा