साखरेची पुरणपोळी
पुरणपोळी हा पदार्थ सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे, महाराष्ट्रामध्ये सण आला की सर्वात प्रथम पदार्थ केला जातो ती म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी आवडत नाही असा माणूस विरळाच. पुरणपोळी ज्या स्त्रीला येते ती गृहिणी उत्तम स्वयंपाकी असे महाराष्ट्रातील गणित असते .कारण पुरणपोळी करण्यासाठी स्त्रीच खर कसब लागतं .
पुरणपोळी दोन प्रकारे करता येते १) साखरेची पुरणपोळी २) गुळाची पुरणपोळी. महाराष्ट्र मध्ये गावाकडील गृहिणी गुळाची पुरणपोळी करण्यास पसंती दर्शवतात, तसे पहायला गेले कि साखरेची व गुळाची पुरणपोळी यांच्या कृती मध्ये थोडासाच फरक आहे.
साहित्य:-
१) १/२ किलो डाळ
२) १/२ किलो साखर
३) ३ ग्लास गव्हाचे पीठ
४) वेलची पूड (आवडीनुसार )
५) तेल (अंदाचे दोन चमचे )
६) मीठ (चवीनुसार)
७) खायचा कलर / हळद (एक चीमट)
कृती :-
१/२ किलो डाळ स्वच्छ धूउन घेणे. एका कुकरमध्ये ३ ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये धूऊन घेतलेली डाळ शिजत घालावी .त्यामध्ये एक टीस्पून तांदूळ घालावे त्याला कुकरची एक शिटी द्यावी . डाळ शिजली की कुकरमधून ती दुसऱ्या भांडयामध्ये काढून घ्यावी, त्यामध्ये १/२ किलो साखर घाला. गोड कमी हवे असेल तर थोडी साखर कमी वापरा. साखर घातलेली डाळ गॅसवरती परत शिजवावी, पुरण (साखर घातलेली डाळ) शिजायला लागले कि भांड्याला खाली लागते (त्यामुळे पुरण शिजवताना भांड्याला जास्त लागू देऊ नये), पुरण घट्ट आले कि गॅस वरून खाली उतरून घ्यावे व त्यामध्ये चवी प्रमाणे वेलचीची पूड घालावी व ते पुरण एकजीव करून पुरण गरम गरम आहे तो पर्यंत वाटून (पुरण यंत्राने) घ्यावे. १/२ किलो डाळीला तीन ग्लास गव्हाचे पीठ ,त्याच्या मध्ये चवी प्रमाणे मीठ घालावे, त्यामध्ये खायचा कलर एक चिमट घाला .कलर नसेल तर हळद घाला (त्याच्यामुळे पोळीला कलर येतो), नंतर दोन चमचे तेल घाला व थोडे थोडे पाणी घालत कणिक सैलसर मळून घ्यावी. पोळी लाटताना जेवढा कणकेचा गोळा असेल त्याच्या पेक्षा थोडेसे जास्त पुरण त्यामध्ये घालावे आणि पोळी लाटावी. पोळी भाजताना थोडेसे तांबूस बारीक बारीक फोड आल्यानंतर पोळी काढावी.
खाली दिलेल्या टिप अवश्य वाचा.
टीप :-
१) १/२ किलो डाळ म्हणजे अंदाजे १.५ ग्लास डाळ.
२) १.५ ग्लास डाळ आलेसतर त्याच्या दुपट पीठ वापराव (३ ग्लास पीठ)
३) कणिक मळल्यानंतर कमीत कमी एक तास ठेवावी.
४) पुरण थंड झाल्यानंतर पोळी करावी.
५) पिठाची पोळी लाटताना कणकेच्या डबल पुरण घालून लाटावी .
६) तेलाची पोळी लाटताना कणकेपेक्षा थोडेसे जास्त पुरण घालुन लाटावी.
![]() |
Photo by - Jayashree |
गुळाची पुरणपोळी
साहित्य:-
१) १/२ किलो डाळ
२) १/२ किलो गुळ
३) ३ ग्लास गव्हाचे पीठ
४) वेलची पूड व सुंठ (अंदाजे चवीनुसार)
५) तेल (अंदाचे दोन चमचे )
६) मीठ (चवीनुसार)
७) खायचा कलर / हळद (एक चीमट)
कृती :-
१/२ किलो डाळ स्वच्छ धूऊन घेणे .एका कुकरमध्ये ३ ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये धूऊन घेतलेली डाळ शिजत घालावी .त्याच्या मध्ये एक टीस्पून तांदूळ घालावे. नंतर कुकरची एक शिटी द्यावी. डाळ शिजली की कुकरमधून ती दुसऱ्या भांडयामध्ये काढून घ्यावी, त्यामध्ये १/२ किलो गुळ बारीक फोडून किवा खिसून घाला (बारीक केल्यामुळे गुळ लवकर विरघळण्यास मदत होते) तुम्हाला जर सेंद्रिय गुळ उपलब्ध होत असेल तर उत्तमच. गुळ घातलेली डाळ गॅसवरती परत शिजवावी, पुरण(गुळ घातलेली डाळ) शिजायला लागले कि भांड्याला खाली लागते (त्यामुळे पुरण शिजवताना भांड्याला जास्त लागू देऊ नये), पुरण घट्ट होत आले की गॅस वरून खाली उतरून घ्यावे व त्यामध्ये चावी प्रमाणे वेलचीची पूड घालावी. पुरण एकजीव करून पुरण गरम गरम आहे तो पर्यंत वाटून (पुरण यंत्राने) घ्यावे. १/२ किलो डाळीला तीन ग्लास गव्हाचे पीठ त्याच्या मध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे, त्यामध्ये खायचा कलर एक चिमट घाला. कलर नसेल तर हळद घाला (त्याच्या मुळे पोळीला कलर येतो), त्यामध्ये दोन चमचे तेल घाला व थोडे थोडे पाणी घालत कणिक सैलसर मळून घ्यावी. पोळी लाटताना जेवढा कणकेचा गोळा असेल त्याच्या पेक्षा थोडेसे जास्त पुरण त्यामध्ये घालावे आणि पोळी लाटावी. पोळी भाजताना थोडेसे तांबूस बारीक बारीक फोड आल्यानंतर पोळी काढावी.
खाली दिलेल्या टिप अवश्य वाचा.
टीप :-
१) १/२ किलो डाळ म्हणजे अंदाजे १.५ ग्लास डाळ.
२) १.५ ग्लास डाळ आलेसतर त्याच्या दुपट पीठ वापराव (३ ग्लास पीठ)
३) कणिक मळल्यानंतर कमीत कमी एक तास ठेवावी.
४) पुरण थंड झाल्यानंतर पोळी करावी.
५) पिठाची पोळी लाटताना कणकेच्या डबल पुरण घालून लाटावी .
६) तेलाची पोळी लाटताना कणकेपेक्षा थोडेसे जास्त पुरण घालुन लाटा
२) १.५ ग्लास डाळ आलेसतर त्याच्या दुपट पीठ वापराव (३ ग्लास पीठ)
३) कणिक मळल्यानंतर कमीत कमी एक तास ठेवावी.
४) पुरण थंड झाल्यानंतर पोळी करावी.
५) पिठाची पोळी लाटताना कणकेच्या डबल पुरण घालून लाटावी .
६) तेलाची पोळी लाटताना कणकेपेक्षा थोडेसे जास्त पुरण घालुन लाटा
टिप्पणी पोस्ट करा