वाटेत एका व्यक्तीचं प्रेत पाहून सुचलेली कविता...
परकं होणं म्हणजे काय...

Image Source - Google | Image by - Donvikor


परकं होणं म्हणजे काय हे मला आज कळल होतं, 
परकं होणं म्हणजे काय हे मला आज कळल होतं,
आपल्या म्हणणाऱ्या माणसांनीच मला दूर केल होतं.

कालपर्यंत यांचाच होतो,कालपर्यंत यांचाच होतो,
पण आज खुप दूर गेलो होतो. साऱ्यांचा लाडका मी, 
एकटाच एका मार्गाने निघून गेलो होतो.

साऱ्यांच्या रडण्याने आसमंत चिंब झाल होतं,
चारही बाजूंनी माझ्या माणसांनी मला घेरलं होतं.
अंगावर पांढरं कापड पांघरलं होतं,
छानशी अंघोळ घालून मला फुलांनी सजवलं होतं.

कोणीही मला आज नावानं बोलवत नव्हतं,
 कोणही मला आज नावानं बोलवत नव्हतं,
 याचच खरंतर वाईट खुप वाटत होतं.

जी रोज बरोबर असायची, आपलं म्हणायची ,
आज तिच मला दूर घेऊन जात होती,
आणि माझ्या देहावर आपली म्हणवणारीच लाकडं चढवत होती.

आज सगळच वेगळं आणि परकं वाटत होतं
कारण या देहानं आज जगच सोडलं होतं.
ही जीवनाची वाट चालून खुप दमलो होतो, ती वाट ही मोठी होती,
म्हणूनच या देहाला मी थोडी विश्रांती दिली होती.

देहात तेवणारी ज्योत विझली होती, शांत झाली होती.


आज सगळच वेगळं आणि परकं वाटत होतं
कारण या देहानं आज जगच सोडलं होतं.
ही जीवनाची वाट चालून खुप दमलो होतो, ती वाट ही मोठी होती,
म्हणूनच या देहाला मी थोडी विश्रांती दिली होती.

देहात तेवनारी ज्योत विजली होती, शांत झाली होती.


कवी -सुरज शिवाजी लाटणे.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने