माय-बाप 

Image Source - Google | Image by - wikipedia

आता नाही वेळ, जोडण्याला हात
असलो जरी मी,तुझा भक्त ||१||

माय-बाप माझे ,तुझ्याहूनी थोर
विठू जरा थांब,तू विटेवर ||२||

माय-बाप सेवा ,पदरात पुण्य
काशी,रामेश्वर ,नको जाणं ||३||

नको पूजायला ,फुल आणि पान 
वंदावे चरण,नियमानं ||४||

नको लावण्यास ,ऊद आणि धूप 
नको वेदमंत्र ,तिन्ही काळ||५|| 

स्वर्गीय सुखाचा ,इथेच ठेवा 
लाभेल सहज ,गाता गोडवा ||६||

कवी - प्रा.सदाशिव गुंडू कुंभार






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने