श्रावण सर 

Image Source - Google | Image by - wallpaperflare

वाटलं होतं श्रावण सर ,सरसर येईल
चिंब भिजायला मिळेल
पण काय घडलं ,कुणास ठाऊक 
श्रावण सर आलीच नाही

वाटलं होतं कोरड्याचा,ओला होईन 
ओलाव्यात बसायला मिळेल 
पण काय कुठं अडलं ,कुणास ठाऊक
ओलावा मिळालाच नाही

वाटलं होतं ,आकाशात ढग येतील
छायेत बसायला मिळेल
पण ढग कुठे गेले,कुणास ठाऊक,
छाया मिळालीच नाही

वाटलं नव्हतं ,उन्हाची तिरीप येईल 
अन चटका बसेल
पण असं का घडलं कळलंच नाही
श्रावण तो आलाच नाही 

कवी -प्रा.सदाशिव गुंडू कुंभार





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने