स्मशानभूमी
![]() |
Image Source - Google | Image by - flickr |
जिथं मनुष्याच्या अचल अस्तित्वाचा शेवट केला जातो .
मनुष्य जिथं स्वतःच अस्तित्व अग्नीला अर्पण करून भस्म करतो.
जिथं मृत्युचं साम्राज्य पसरलेले असतं .
जिथं दुखाचं वातावरण आच्छादलेलं असतं .
जिथं मृत्यूचा शोक घोटमळत असतो .
एका भयानक सत्याचा उलगडा जिथं स्वीकारावा लागतो .
ज्या ठिकाणी स्वतःला दुःखात सामावून घेतलेले चेहरे दिसतात .
जिथं एका वाऱ्याची झुळूकदेखील हृदयात दुःखाचे तरंग उठवते .
जिथं नदीच्या संथ पाण्यात दुःखाची लाट असलेली जाणवते .
जिथं निसर्गसुद्धा आपल्या भावनांना दुःखात सामावून घेतो .
जिथं सर्व अजस्त्र धांदल संपते आणि एका कटू सत्याचा प्रारंभ होतो .
अशा स्मशानभूमीत अनेक विचारांनी गुंफलेल माझं मन मला काहीतरी सांगत होतं .
“मनुष्याला मृत्यूची ओढ नसते पण मृत्यूला मनुष्याचं आकर्षण असतं”.
टिप्पणी पोस्ट करा