घास भरविताना 

Image Source - Google | Image by - unicef


आईच्या हाती 
दुधभाताची वाटी 
बाळाच्या ओठी 
दोन हाताच्या मुठी 

आईच्या मुखी 
काऊ-चिऊची गाणी
बाळाच्या ओठी 
बोल-बोबडी वाणी

आई वदे बाळाला 
राम-कृष्णाची कहाणी 
बाळ हले डुले
नव्या-कोऱ्या बाहुलीवणी  

आईच्या हाती फक्त 
राही रिकामी वाटी 
बाळाच्या तोंडी ,
लागे पाण्याची लोटी 

कवी - प्रा.सदाशिव गुंडू कुंभार






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने