का? 

Image Source - Google | Image by - wallpaperflare


का भिडविशी नजरेला नजर
का छेडिशी तु मनाची सतार,
का हसतेस खुदकन गाली 
का खुलवितेस हसून लाली 

का मुरडून जाशी जवळूनी 
का कटाक्ष टाकशी दुरुनी
का उगीचच वाढते हुरहूर
सांगशिल का त्याचे गुपित

का वाढविशी शोभा
शोभा तूझ्या हास्याची 
का हास्यातच दाखविशी 
प्रतिबिंब तुझे माझ्या मनाशी

उत्तर या ‘का’ चे‌‍
कळेल का कधीतरी
का राहील हा ‘का’
शेवटी अनुत्तरीतच...... 

कवी - प्रा.सदाशिव गुंडू कुंभार





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने