खबरदार
![]() |
Image Source - Google | Image by - thoughtco |
खबरदार जरा खडा मारुनी
उगाच डिवचाल मला
देईन डंख असा तुम्हा की,
मागाल पाणी पाणी तेव्हा
मी न कुणाचा कधी अपराधी
नसे भीती मज कधी कुणाची
उगा म्हणाल जर मारले घोडे
विळखा घालून करीन हाल हाल
बहु असोत सुंदर संपन्न किती
अडे न इथे कुणाचे कुणावाचूनी
उगीच अडवाल इथे तुम्ही जर
पाडीन आडवे ,पाय ओढून खरोखर
देणे घेणे न असे,तुमचे आमचे काही
सरळ वाट ही ,तुमची आमची
उगा वाकड्या वाटेने,कळ नका काढू
अन्यथा नसानसातून रक्त तुमच्या पिळवटून काढू
टिप्पणी पोस्ट करा