शोध



आज अचानक निघून गेलीस,

झाला एकांत एकांत

बांधूनी वळकटी मी निघालो,

तुझ्या शोधात शोधात


वणवण फिरलो दारोदारी ,

कुठे ना दिसलीस

हाक मारून कंठ सोकला,

हाक ना दिलीस


वाट पाहूनी डोळे थकले,

झाला अंधकार  

शोधितो मी तुझीच मूर्ती ,

सारा अंधार अंधार



Image Source - Google | Image by - wikimedia 

भटकता भटकता दिसलीस,

डोक्यावर ओझे घेऊन 

‘आई’ म्हणूनी हाक मारता ,

स्वप्न गेलं तुटून 


कवी - प्रा.सदाशिव गुंडू कुंभार



माझी माय मराठी कविता 




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने