वास्तव 

Image Source - Google | Image by - flickr

तुझे बटबटीत डोळे
अन त्रिकोणी चेहरा 
याला घाबरतो कोण?

तुझा डरावं डरावं आवाज 
अन चिखलात लोळणं 
तुला दगड मारीत नाही कोण?

तुझा पावसाळ्याचा हंगाम
अन उन्हाळ्यात दडी 
तुला विचारतोय कोण?

कूप म्हणजे सर्व जग
अन सर्वस्व माझं माझं 
असं तू समजू नको

तुझ्या चार तंगड्याच 
अन-शरीराचे तुकडे
किंमत त्यांची फारच कमी

म्हणून ऊतू नको,मातू नको
अन गर्वाने फुगू नको.

कवी - प्रा.सदाशिव गुंडू कुंभार





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने