केव्हातरी माणसा
![]() |
Image Source - Google | Image by - publicdomainvectors |
केव्हातरी माणसा,
हृदय प्रेमाने भरशील का ?
भरून वाहून तर जाणार नाही
याची खबर खेशील का ?
केव्हातरी माणसा,
डोळ्यांची ओंजळ अश्रूंनी भरशील का ?
त्या ओंजळीने अश्रूंचा
ओलावा गालांना देशील का ?
केव्हातरी माणसा,
भावनांना वाचा फोडशील का ?
तडे तर पडणार नाहीत त्यांना
याची खबर घेशील का ?
केव्हातरी माणसा
सुखाच्या पारड्यात
दुःखाची रद्दी तोलणार का ?
तोलता तोलता पारड्याची
किंमत मोजणार का ?
टिप्पणी पोस्ट करा