कातरवेळ 

Image Source - Google | Image by - pikist

का अशी संध्या होते 
या कातरवेळी ती शांत होते 
मनात काहूर असा का माजतो 
क्षणा क्षणाला कुठवर नेतो     

ती संध्या कधी काठावरची 
ती संध्या कधी रातराणी पुढची 
तीच कधी हातात हात घातलेली
ती कधी उशीत तोंड लपवलेली

चाफ्याच्या पाकळयांखाली सुवासलेली
रातराणीचा सुगंध भरभरून घेतलेली
तासान तास गुजगोष्टी केलेली
मनावरचा ताबा सोडून मन बावरलेली

तीच संध्या कधी त्याची न तिची
दोघांच्या आठवणीने हसलेली कशी
बाहुपाशात अडकून बिलगली अशी
दोन देह एक जीव जशी

कवी - सागर ओतारी 




1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने