नजरकैद 

Image Source - Google | Image by - ancient-origins


ती अशी नजर चोरून पाहते,
प्रेमाची कट्यार काळजावर चालते
बेभान होऊन जीव बेधुंद नजर होते,
नजरेपासून लांब होत असताना
नजरेत तिलाच नजरकैद करते...

श्रुंगारात मदमस्त ती होती,
ओठी लाली ही लाल होती
काजळात  ती अप्सरा कशी ,
उठून दिसत होती ...

प्रेमात चिंब होऊन धुंद व्हावे,
प्रेमरसात न्हाऊन निघावे 
नजरेत सर्व सामावून,
नजरेत फक्त तिलाच पहावे...

कवी :- सागर ओतारी 







Post a Comment

थोडे नवीन जरा जुने