डिटॉक्स (Detox)

आजकाल आपण डिटॉक्स शब्द खूपवेळा ऐकतो. डिटॉक्स म्हणजे शरीरातील विषकारक घटक  शरीराबाहेर टाकणे.

डिटॉक्स फूड (Detox Food ) म्हणजे हे विषकारक पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त असणारे पदार्थ .खरेतर शरीरातून नको असणारे पदार्थ बाहेर टाकण्याचे काम कोणताही पदार्थ करू शकत नाही.

Detox Food


आपले शरीरच एक स्वयंचलित प्रयोगशाळा आहे. ती स्वतःच हे पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते .आजकाल अनेक जाहिराती प्रसारमाध्यमावर झळकत असतात; “हे खाल्यामुळे तुमच्या शरीरात नको असणारे घटक शरीराबाहेर टाकले जातील ” “तसेच वजन कमी होईल”.जे साफ चुकेचे आहे . डिटॉक्स हा चुकीचा समाज आहे . कोणताही पदार्थ एका गोळीने/ औषधाने शरीराबाहेर टाकला जात नाही , मग ते चरबी असो किंवा दुसरे काही किंवा कोणत्याही औषधाने पोटाची चरबी कमी होत नाही तसेच केस गळतीही थांबत नाही . डिटॉक्स करण्यासाठी विचित्र डाएट करू नका ,नको ती औषधे घेऊ नका.

डिटॉक्स नैसर्गिकरित्या होण्यासाठी उपाय –

शांत व पुरेशी झोप 

पुरेसा व्यायाम (अति नाही )

पोषक आहार (जास्त प्रमाणात फळे व भाज्या )

दुध व दुग्धजन्य पदार्थ 

मोबाईल व टीव्ही ची संगत कमी; निसर्गाशी संगत जास्त 

सगळ्यात महत्वाचे ७ ते ८ ग्लास पाणी प्रतिदिन .


खऱ्या अर्थाने विषकारक पदार्थ कोणते? 

१) प्रयोगशाळेत तयार केली जाणारी रसायने (उदा. औषधे )

२) जड मूलद्रव्ये (रासायनिक खाते व कीटकनाशके )

३) प्रक्रिया केलेले पदार्थ (उदा.  ‌पॅकेटमध्ये असणारे )


डिटॉक्स प्रक्रिया नैसर्गिकरीत्या पार पडणारे अवयव 

१) यकृत (Liver)

२) वृक्क (Kidney)

शरीरात सतत उर्जा निर्मिती होत असते .उर्जेसोबत कार्बन डायऑक्साईड(co2), पाणी(H20) तयार होते. शरीरातील सर्व पाणी दोन किडनी मिळून सतत गाळत (Filter) असतात.किडनीचे वजन काही ग्रँम आहे,परंतु दिवसभरात १८०लि. ते २०० लि.पाणी गाळप करतात .त्यामधून हवे असणारे द्रव शरीरात परत शोषले जातात. नको असणारे विषकारक घटक लघविवाटे शरीराबाहेर टाकले जातात.म्हणूनच डिटॉक्स करण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही.फक्त पुरेसे पाणी प्या.(८ ते १० ग्लास )

३) पचनसंस्था (Digestive System)

४) त्वचा (Skin)

त्वचा हा उत्सर्जन करणारा सर्वात मोठा अवयव आहे.त्वचेला लहान लहान असंख्य छिद्रे असतात.या छिद्रामधून घामावाटे पाणी बाहेर पडते.या घामासोबत शरीरात नको असणारे विषकारक घटक बाहेर पडतात.घाम येण्यासाठी व्यायाम/चालणे(३० मि.)करावे.

५) फुफ्फुस (Lungs)

जर वरील अवयव निरोगी व स्वस्थ असतील तर शरीराची डिटॉक्स प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरळीत पार पडेल .

त्यासाठी कोणताही पदार्थ/औषध/गोळ्या घेण्याची गरज नाही.


शरीरातील डिटॉक्स प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरळीत पार पडण्यासाठी काही सोपे उपाय :

१) मद्यपान करू नये.

मद्यपानामुळे यकृतावर परिणाम होतो. परिणामी ते निकामी होण्याची शक्यता असते.

२) पुरेशी झोप (आठ तास)

पुरेशी झोप घेतल्याने आरोग्य सुधारते व नैसर्गिकरितीने उत्सर्जन होते .

३) पुरेसे पाणी 

पाणी नुसतेच तहान भागवत नाही तर शरीराचे तापमानही योग्य राखण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर हाडामध्ये असणारे वंगण सुधारते/सुरक्षित ठेवते.पचनक्रिया सुधारते, पोषकतत्वे शोषण व शोधन करण्यास मदत करते आणि नको असणारे घटक लघवीवाटे शरीराबाहेर टाकते .

४) साखर व प्रक्रियायुक्त पदार्थ कमी –

या पदार्थामुळे शरीराचा स्थूलपणा वाढतो .त्याचबरोबर हृदयविकार, कॅन्सर, डायबेटीस सारख्या आजारांना आमंत्रण देतात.

५) अँटिआँक्सीडंट पदार्थाचे सेवन करावे.

*आंबट फळे * भाज्या * काळा चहा + लिंबू 

*फळे * मसाले *जीवनसत्वे  

*बदाम * गवती चहा

   ६) जास्त तंतुमय पदार्थ खा :

उदा. काकडी, टोमॅटो, मुळा, कोबी, बीट.

   ७) दररोज पुरेसा व्यायाम करा .

   ८) आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे .




डिटॉक्स करण्याचा दुसरा मार्ग:

फुफ्फुस’

आपण नाकावाटे शरीरात सतत ऑक्सिजन आत घेत असतो व कार्बन डायओक्साईड बाहेर सोडत असतो. कार्बन डायओक्साईड हा विषकारक घटक असला तरी तो बाहेर टाकण्यासाठी वेगळ अस काहीच करावे लागत नाही.

लक्षपूर्वक हे करा :

मोठा श्वास घ्या ५ सेकंद श्वास रोखा . आता सोडा .

आहे ना सोपा मार्ग . म्हणून अधून मधून मोठे श्वास घ्या.


श्वासाचा वास कमी करते.

लसून,मासे,कांदा यासारख्या गंधयुक्त पदार्थामुळे तोंडातील श्वासाला वास येतो.वास घालवण्यासाठी जेवणानंतर आणि सकाळी उठल्यावर एक ग्लास लिंबू पाणी प्यावे.(टीप:फक्त कोमट पाण्यासोबत घ्यावे) लिंबू लाळेला उत्तेजन देतो.तोंड कोरडे पडू देत नाही.

लिंबू पचनास मदत करते

आयुर्वेदात बद्धकोष्टता रोखण्यासाठी काही रोज सकाळी कोमट पाण्यासोबत लिंबू घेण्यास सुचवले आहे. आयुर्वेदात म्हटले आहे; आंबट लिंबाची चव ‘अग्नी’ला उत्तेजन देते.(भूक लागणे असा अर्थ घ्यावा.) लिंबू पाचक म्हणून खालीलप्रमाणे वापरावा.

लिंबू+सैंधव मीठ 

लिंबू वजन कमी करण्यास काही अंशी मदत करते.

लिंबूमध्ये आढळणारे पॉलिफेनॉल अँ‌‍‌टिआँक्सिडंट लठठपणा कमी करण्यास मदत करते.हे अँ‌‍‌टिआँक्सिडंट संयुग रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवते.मधुमेह असणारया व्यक्तीसाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी काही अंशी गुणकारी.

जीवनसत्व ‘क’ (vitamin C) चा उत्तम स्तोत्र 

विटामिन c


लिंबूवर्गीय फळामध्ये जीवनसत्व ‘क’ जास्त प्रमाणात असते. जीवनसत्व ‘क’ हा प्राथमिक अँ‌‍‌टिआँक्सिडंट आहे,जो आपल्या शरीरातील पेशीमध्ये असणारे मुक्त आयन प्रभारविरहित करतो.पेशींचे मुक्त आयनापासून(Free Radicals) बचाव करते. जीवनसत्व ‘क’हृदय,रक्तवाहिन्यांसंबंधी रोग,स्ट्रोक,रक्तदाब कमी करणे/जास्त असणे अशा रोगांसंबंधी धोके टाळण्यास मदत करते.साधारणपणे एका लिंबाच्या रसात १६-१८ मिली ग्रँम व्हिटॅमिन सी असते.प्रौढांसाठी व्हिटॅमिन सी घेण्याची मात्रा साधारण ६५ ते ९० मिली ग्रँम प्रतिदिन . 

लिंबामध्ये असणारे जीवनसत्व ‘क’ त्वचेवरील सुरकुत्या,कोरडी त्वचा व त्वचेवरील काळपटपणा (टॅनिंग) कमी करण्यास मदत करते.

लिंबू हायड्रेशनला प्रोत्साहन देते.(शरीरातील पाणी पातळी सुधारण्यास मदत करते.)

पाणी हायड्रेशनसाठी सर्वोत्तम पेय आहे.परंतु पाण्याला स्वतःची चव नसल्याने,काही लोक पाणी पिण्याचे टाळतात. पाणी पिण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी १ ग्लास पाण्यात लिंबू पिळावा .


लेखक- सौ. श्वेता अक्षय भिंगार्डे 

 



5 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने